पश्चिम बंगाल शिक्षक भरती घोटाळा प्रकरण
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालमधील बहुचर्चित शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी ईडीने तृणमूल काँग्रेसचे आमदार जीवन कृष्णा साहा यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे. साहा यांना सोमवारी सकाळी 11 वाजता एजन्सीच्या कोलकाता कार्यालयात बोलविण्यात आले आहे. याच प्रकरणात सीबीआयने 17 एप्रिल 2023 रोजी साहा यांना अटक केली होती. मात्र, नंतर त्यांची सुटका करण्यात आली. जुलै 2022 मध्ये शिक्षक भरती घोटाळा उघडकीस आला होता. त्यानंतर सीबीआयने पश्चिम बंगालचे माजी शिक्षणमंत्री पार्थ चॅटर्जी यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांना अटक केली. तसेच ईडीच्या छाप्यात पार्थ चॅटर्जीच्या निकटवर्तीय अर्पिता मुखर्जीच्या घरातून रोख 21 कोटी रुपये आणि सुमारे 1 कोटी रुपयांचे दागिने जप्त केले होते.









