रत्नागिरी :
महाराष्ट्रातील कला शिक्षकांचे राज्यस्तरीय कला प्रदर्शन मुंबईतील पु.ल. देशपांडे कला अकादमी येथे ७ एप्रिल ते १० एप्रिलपर्यंत स. ११ ते सायं. ७ वाजेपर्यंत सर्व कलारसिकांना विनामूल्य पाहण्यास खुले राहणार आहे. त्यामध्ये रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी पंचक्रोशीतील गुरु-शिष्य असलेल्या त्रिमूर्तीच्या चित्रकलेचा आविष्कार पाहायला मिळणार आहे.
यामध्ये रत्नागिरीतील तरवळ गावातील सुपुत्र अर्जुन माचिवले सध्या मुंबई येथे कला शिक्षक म्हणून कार्यरत आहेत, त्यांचे शिष्य रोशन गोताड (खालगाव), दत्ताराम मायंगडे (तरवळ) सध्या हे दोन्ही विद्यार्थी मुंबई येथे शाळेमध्ये कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. यांची कला सर्वांना पहायला मिळणार आहे.
या चित्रकला प्रदर्शनात महाराष्ट्रातून जास्तीत जास्त कला शिक्षक सहभागी होणार आहेत. कला शिक्षकांसाठी फलक लेखन स्पर्धा आयोजित केली होती विजयी स्पर्धकांना बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे.








