प्रतिनिधी /बेळगाव
गँगवाडीजवळ पन्नी विकणाऱया तिघा जणांना अटक करण्यात आली आहे. सोमवारी सीसीबीच्या अधिकाऱयांनी ही कारवाई केली. या त्रिकुटाकडून पन्नीच्या 85 पुडय़ा जप्त करण्यात आल्या आहेत.
तन्वीर मेहबूब देशनूर (वय 40) रा. रविवारपेठ, सद्दाम अकबर देशनूर (वय 31) रा. गांधीनगर, मयूर हरिभाऊ भातकांडे (वय 27) रा. सरस्वतीनगर-गणेशपूर अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. वरि÷ अधिकाऱयांच्या मार्गदर्शनाखाली सीसीबीचे पोलीस निरीक्षक निंगनगौडा पाटील व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे.
पोलिसांनी 27 ग्रॅम पन्नी, 3 मोबाईल संच जप्त केले आहेत. जप्त पन्नीची किंमत 34 हजार रुपये इतकी होते. यासंबंधी सीईएन पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.









