किस किसको प्यार करूं 2 चित्रपटात भूमिका
कपिल शर्माचा आगामी चित्रपट ‘किस किसको प्यार करूं 2 चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. कपिल शर्मासोबत या चित्रपटात 4 अभिनेत्री दिसून येणार असून यात त्रिधा चौधरी आणि पारुल गुलाटीचा समावेश आहे. 2015 मध्ये प्रदर्शित कपिलचा चित्रपट ‘किस किसको प्यार करूं’ला प्रेक्षकांची पसंती लाभली होती. चित्रपटात त्याने तीन युवतींसोबत विवाह केला होता आणि त्याला एक गर्लप्रेंड होती. आता 10 वर्षांनी याचा सीक्वेल येणार आहे.
दीर्घकाळापासून कपिलच्या या चित्रपटावरून चर्चा सुरू आहे. निर्मात्यांनी पोस्टर्सद्वारे चाहत्यांची उत्सुकता वाढविली आहे. ‘डोली उठी, दुर्घटना घटी’ अशी पॅप्शन देत कपिलने या चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर पेले आहे. ‘किस किसको प्यार करूं 2’ हा चित्रपट 12 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात कपिलसोबत मनजोत सिंह, आयशा खान, हीरा वरीना, पारुल गुलाटी आणि त्रिधा चौधरी हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. मोशन पोस्टरमध्ये आयशा खान मुस्लीम, हीरा पंजाबी, पारुल ख्रिश्चन तर त्रिधा हिंदू नववधूच्या लुकमध्ये दिसून येत आहे.









