वार्ताहर /जुने गोवे
गोव्यातील सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे सहकार भारती गोवा या सहकार क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कार्य करणाऱया संस्थेचे अध्यक्ष स्व. श्री राजकुमार देसाई यांना सहकार भारती गोवा च्या वतीने श्रद्धा?जली अर्पण करण्यात आली.
गोवा राज्य सहकारी बँकेच्या सभागृहात रविवारी दुपारी श्रद्धा?जली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सहकार भारती संस्थेचे माजी अध्यक्ष प्रकाश वेळीप, प्राध्यापक दत्ता नायक, सुभाष हळर्णकर,दादी नाईक, महेश आमोणकर, नागेश गोसावी, सुदेश नागवेकर,सौ विशाखा वेळीप यांची स्व. राजकुमार देसाई यांना श्रद्धा?जली वाहणारी भाषणे झाली.
सुरवातीला अशोक गावडे यांनी सहकार भारती च्या वतीने उपस्थितांचे स्वागत करुन श्रद्धा?जली वाहिली. रघुवीर वस्त यांनीही श्रद्धा?जली वाहिली. मोठय़ा संख्येने उपस्थित असलेल्या सहकार भारती पदाधिकारी व सहकार क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी प्रतिमेला पुष्प अर्पण करून स्व. राजकुमार देसाई यांना श्रद्धा?जली वाहिली. अंकुश शिरोडकर यांनी श्रद्धा?जली वाहून उपस्थितांचे आभार मानले.









