मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची घोषणा
प्रतिनिधी/ फोंडा
गोव्याला लाभलेले आयआयटीयन माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांचे स्वप्न साकार करण्याहेतू आयआयटी गोवासाठी कायमस्वरूपी केंद्र उभारण्यासाठी आपले सरकार प्रयत्नशील आहे. देश स्वातंत्र्याची अमृतमहोत्सवी साजरी करताना ‘आत्मनिर्भर भारत’सह स्वयंपुर्ण गोव्यात औद्योगिक स्टार्टअप निर्मितीसाठी आयआयटीसारख्या संस्था अंत्यत उपयुक्त ठरत आहे. संशोधन वृत्ती जोपासून विद्यार्थ्यांनी नवभारत निर्माण करण्यासाठी आयआयटीच्या माध्यमातून देशसेवा द्यावी असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
फर्मागुडी फोंडा येथे कार्यान्वित असलेल्या आयआयटी गोवा केंद्राच्या तिसऱया दिक्षांत सोहळय़ात ते प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. काल शनिवारी राजीव गांधी कला मंदिर येथे हा सोहळा थाटात संपन्न झाला. यावेळी आयआयटी मुंबईचे प्राचार्य देवांग हक्कर, प्राचार्य बी कें. मिश्रा, प्रा. सचिन कोरे, आयआयटी गोवाचे संचालक नितीन कुंकळीकर उपस्थित होते.
मासळीत सापडणाऱया मायक्रे प्लास्टीक कणाबाबत संशोधन क्हावे
यावेळी पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले आयआयटी गोवाने कोविड काळातही राज्यभरातील कोरोनाबाधित रूग्णांना विलगीकरण केंद्र उभारून सेवा बजावली होती. आयआयटीच्या विद्यार्थ्यातर्फे कोविड महामारीत झुंज देणाऱया प्रंटलाईन वॉरिअर्ससाठी फेसशिल्ड ची निर्मितीसाठी खास आभार व्य़क्त केले. आयआयटी गोवाचेही महत्वाचे योगदान राहिल्याचे सांगण्यात ते विसरले नाही. येत्या काळात विद्यार्थ्यानी पर्यावरणाचे संतुलन कायम राखण्यासाठी, तसेच प्रदुषण नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयोगशील रहावे. गोव्यातील मासळीत सापडणाऱया मायक्रो प्लास्टीकच्या कणावर नियंत्रण ठेवण्यासाठी संशोधनात्मक कार्य आयआयटी विद्यार्थ्याकडून अपेक्षित असल्याचे ते म्हणाले. कोठार्ली-सांगे येथे आयआयटीसाठी जागेचे सर्वेक्षण होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री यांनी कायमस्वरूपी केंद्राची उभारणी येत्या काळात पुर्ण होईल असे सांगे येथील नाव न घेता ईशाराही यावेळी बोलताना दिला.
यावेळी आयआयटी क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थी देवयानी तूषार मलाडकर, तुश्या छेडा, श्रेया पवार, जयनाम जैन, यतीद्र रायकर, सिद्धार्थ सोलंकी, देवांग जैन, देवीरेड्डी मनोज, सक्षम गोयल, सोहन श्रीरंग, रोहित एस, हरी शंक आर, शिवम गुप्ता, सिद्धेश शेणॉय, प्रिन्स कुमार, सकर हेमंत साळूंके याना उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याहस्ते गौरविण्यात आले. त्यांना सुवर्ण, रौप्य व कास्यपदके देऊन गौरविण्यात आले. आयआयटी गोव्याच्या गुणवंत विद्यार्थ्याचे अभिनंदन केले. पदवीदान सोहळय़ात एमटेक व बीटेक विद्यार्थी व पालक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.









