मेलबर्न :
भारत व ऑस्ट्रोलियाच्या सामन्यावेळी दोन्ही संघांतील खेळाडूंनी उजव्या हाताच्या दंडाला काळ्या फिती बांधल्या होत्या तर भारतामध्ये झालेल्या महिलांच्या उपांत्य सामन्यावेळीही दोन्ही संघांच्या खेळाडूच्या हाताला दंडाला काळ्या फिती बांधून सरावावेळी चेंडू डोक्याला लागून दुर्दैवी मृत्यू झालेल्या 17 वर्षीय बेन ऑस्टिनला श्रद्धांजली वाहिली. मेलबर्नमध्ये मंगळवारी नेटमध्ये सराव करत असताना बेन ऑस्टीनच्या मानेवर वेगवान चेंडू आदळला. या क्षणीच तो मैदानावर कोसळला व त्याचा अखेर मृत्यू झाला होता.









