आघाडीच्या नियतकालिकात मिळाले स्थान
106 वर्षीय पारंपरिक टॅटू कलाकार ‘अपो वांग-ओड’ या फॅशन मॅगजीन वेगच्या प्रतिष्ठित मुखपृष्ठावर स्थान मिळविणाऱया सर्वात वृद्ध व्यक्ती ठरल्या आहेत. पांढऱया केसांसह आणि अनेक टॅटूंसह त्या अत्यंत आकर्षक दिसून येत आहेत. फिलिपाईन्स्च्या कलिंगा प्रांतात बुस्कलन येथील पर्वतीय गावात राहणाऱया अपो वांग-ओड यांनी किशोरवयात असताना हाताने टॅटू काढण्याची स्वदेशी परंपरा आत्मसात केली होती. वांग-ओड यांना सर्वात जुन्या आणि बहुधा अखेरची माम्बातोक (पारंपरिक कलिंग टॅटू कलाकार) मानले जाते.

बटबूट समुदायाच्या योद्धय़ांसाठी राखीव या टॅटूचे सांस्कृतिक दृष्टय़ा अत्यंत मोठे महत्त्व होते तसेच ही कला अत्यंत मेहनतीने शिकावी लागत होती. आता वांग-ओड बहुतांशकरून आंतरराष्ट्रीय अतिथींना याचे धडे देत आहेत. वांग-ओड आता स्वतःच्या प्रसिद्ध डिझाइन्ससाठी कलिंगचा दीर्घ प्रवास करत असतात. टॅटू काढून घेण्यासाठी लोक येत राहतील तोपर्यंत ही परंपरा सुरूच राहणार असल्याचे त्यांचे मानणे आहे.
अशाप्रकारचा टॅटू काढणारी मी एकमेव व्यक्ती आहे. परंतु आता अनेक तरुण-तरुणी ही कला शिकून घेत आहेत. याचमुळे माझ्या मृत्यूनंतरही टॅटू काढून घेण्याची ही कला सुरूच राहणार असल्याची अपेक्षा असल्याचे वांग-ओड यांनी सांगितले आहे. मागील अनेक वर्षांपासून त्या स्वतःच्या नाती इलियांग विगन आणि ग्रेस पलिकास यांना या कलेचे धडे देत आहेत. या कलेत केवळ बांबू, पोमेलोच्या झाडांचे काटे, पाणी आणि कोळशाचा वापर करून टॅटू काढला जाता. ही कला केवळ रक्ताच्या नात्यातील लोकांना शिकविली जाऊ शकते. वांग-ओड आता पुढील पिढीला याचे प्रशिक्षण देत आहेत.









