510 एनसीसी पॅडेट्सनी घेतला भाग : जाधवनगर पॅम्पमध्ये आयोजन
प्रतिनिधी / बेळगाव
15 डिसेंबरपासून सुरू झालेल्या ऑल इंडिया बेळगाव ट्रेकमध्ये 510 पॅडेट्सनी भाग घेतला. तसेच 7 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा समावेश असलेल्या 5 डायरेक्टोरेट्सच्या 15 असोसिएट एनसीसी ऑफिसर्सनी यात भाग घेतला. येथील जाधवनगर एनसीसी पॅम्पसमध्ये आयोजित बुधवारी पार पडलेला सांस्कृतिक कार्यक्रम अधिकच प्रभावी ठरला.
या पॅम्पमध्ये पॅडेट्सना भारतीय सैन्याची प्रतिष्ठित प्रशिक्षण संस्था ‘द कमांडो स्कूल’मध्ये नेण्यात आले. तेथे पॅडेट्ससमोर साप हाताळण्याचे प्रात्यक्षिक सादर केले. लिडो जम्प, कमांडो स्लाईड आणि शस्त्ररहित कॉम्बॅटचेही प्रात्यक्षिक पाहण्याची संधी या पॅडेट्सना मिळाली.
मराठा लाईट इन्फंट्री ट्रेनिंग सेंटरमध्ये जाण्याची संधी मिळाल्यावर पॅडेट्सचे मनोबल अधिकच वाढले. त्यांना प्रशिक्षणार्थी सैनिकांचे लेक्चर-कम-डेमोज, फिजिकल ट्रेनिंग, ड्रिल पाहता आले. मराठा म्युझियमला भेट देत अनेक गोष्टी जाणून घेतल्या.
प्रशिक्षणात भाग घेतलेले पॅडेट्स सैन्यात सामील होण्यासाठी अधिकच समर्पित झाले आहेत. सैनिकी बाणा, लढण्यासाठीची जिद्द आणि संघभावना वाढविणाऱ्या स्पर्धा पॅडेट्ससाठी आयोजिण्यात आल्या होत्या. अॅथलेटिक्स, व्हॉलीबॉल आणि टग ऑफ वॉर स्पर्धा ट्रेकिंग पॅडेट्सकरिता आयोजिण्यात आल्या.
26 कर्नाटक एनसीसी बटालियन बेळगावचे कमांडिंग ऑफिसर कर्नल एस. दर्शन यांनी पॅडेट्सना मार्गदर्शन केले. धैर्य, नेतृत्व आणि जोश हे गुण एनसीसी पॅडेट्सच्या अंगी बाणविण्यासाठी हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यावेळी विंग कमांडर दीपक बल्हारा, लेफ्टनंट कर्नल सी. बी. नंदकुमार, सुभेदार मेजर निलेश देसाई, पॅप्टन महेश गुरनगौडर उपस्थित होते. पॅडेट विशाल, पॅडेट बिलाल आणि पॅडेट यश यांनी सूत्रसंचालन केले. या सोहळ्याची सांगता एनसीसी गीताने झाली.









