बेळगाव : मंगळवारी झालेल्या दमदार पावसामुळे शहरामध्ये विविध ठिकाणी झाडे कोसळली आहेत. सुदैवानेच या घटनेमध्ये कोणीही जखमी झाले नाही. जेएमएफसी न्यायालयाच्या आवारामध्ये एक झाड कोसळले तर सिव्हील हॉस्पिटल रोडवरील आंबेडकर उद्यानासमोर पदपथावरच असलेले एक झाड कोसळले. यावेळी त्याठिकाणी कोणी नसल्याने सुदैवाने अनर्थ टळला.
जेएमएफसी न्यायालयाच्या आवारात एक झाड उन्मळून पडले. यामध्ये संरक्षक भिंतीचे किरकोळ नुकसान झाले. तर आंबेडकर गार्डनसमोरच पदपथावर असलेले झाड कोसळले. यावेळी सुदैवाने या घटनेमध्ये कोणालाही दुखापत झाली नाही. धोकादायक झाडे, तसेच झाडांच्या धोकादायक फांद्या हटवाव्यात, अशी मागणी करण्यात आली. मात्र त्याकडे महानगरपालिका व वनविभागाने दुर्लक्ष केले आहे. परिणामी अशा घटना आता घडू लागल्या आहेत. यामुळे जनतेतून नाराजी व्यक्त होत आहे.










