अन्य उपाययोजना देखील कराव्या लागणार
वेगाने वाढणारी पिके घेणे, उत्सर्जित कार्बन डायऑक्साइडला कॅप्चर करत संग्रहित करणे आणि वातावरणातू ग्रीनहाउस गॅसेसना हटविणे हे हवामान बदल मर्यादित करण्याच्या महत्त्वपूर्ण उपाययोजना मानल्या जातात. परंतु एका नव्या संशोधनानुसार जर ही प्रक्रिया वर्तमान कृषी भूमीपासून वेगळ्या क्षेत्रांमध्ये करण्यात आली, तर यामुळे पारिस्थितिकी तंत्राला धोका निर्माण होऊ शकतो.
पॉट्सडॅम इन्स्टीट्यूट फॉर क्लायमेट इम्पॅक्ट रिसर्चकडून (पीआयके) करण्यात आलेल्या एका अध्ययनात वृक्षारोपण आणि बायोएनर्जीसोबत कार्बन कॅप्चर आणि स्टोरेज (बीईसीसीएस)च्या शक्यतांचे विश्लेषण करण्यात आले आहे. 2050 पर्यं कृषी भूमीतून केवळ 20 कोटी टन सीओ2 हटविला जाऊ शकतो, जो अनेक हवामान स्थितींमध्ये अपेक्षित स्तरापेक्षा अत्यंत कमी आहे. जर आम्ही तंत्रज्ञानाद्वारे हवेतून थेट सीओ2 हटविण्याच्या प्रणालीवर लक्ष न दिल्यास आम्हाला वर्तमान कृषीभूमीचा वापर करावा लागेल. हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा खाद्यप्रणालीत बदल करण्यात येतील आणि मांस तसेच अन्य पशुउत्पादनांचा वापर कमी करण्यात येईल असे अध्ययनात म्हटले गेले आहे.









