सातारा :
शासनाच्या वृक्ष लागवड व 150 दिवसांच्या कृती आराखड्यानुसार जलसंपदा विभागाच्या सिंचन भवनाच्या 60 एकर परिसरात 3 हजार 500 वृक्षांची लावगड करण्यात येणार आहे. या वृक्ष लागवडीचा शुभारंभ जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते वृक्षाची लागवड करुन करण्यात आला.
या प्रसंगी उपवनसंरक्षक अमोल सातपुते, अपर जिल्हाधिकारी मिल्लाकर्जुन माने, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभय काटकर, जयंत शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, प्रांताधिकारी आशिष बारकुल, तहसीलदार समीर यादव यांच्यासह जलसंदा विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
सिंचन भवनाच्या परिसरात आज सुमारे 200 वृक्षांची लागवड करण्यात आली. लागवडीनंतर जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या विविध शाखांना भेटी देऊन कामकाजाची पहाणी केली व समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांनी जिहे-कठापूर योजनेच्या प्रतिकृतीची पाहणी केली.








