बेळगाव :
निसर्ग संवर्धनासाठी सुवर्णलक्ष्मी सोसायटीतर्फे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याअंतर्गत हिंडलगा-सुळगा येथे विविध रोपे लावण्यात आली. चेअरमन विठ्ठल शिरोडकर यांनी, सोसायटीचे सभासद असलेल्या भागात वृक्षारोपण करून वृक्षसंवर्धनाची मोहीम हाती घेतल्याचे सांगितले. हा उपक्रम राबविल्याबद्दल सुळगे ग्रामस्थांनी कौतुक केले. यावेळी मोहन कारेकर, विजय सांबरेकर, सर्वश्री कारेकर, प्रकाश वेर्णेकर, समर्थ कारेकर, माणिक सांबरेकर, राजू बांदिवडेकर, विराज सांबरेकर, प्रदीप किल्लेकर, सुधीर सावंत, सचिन लाड आदी उपस्थित होते.









