दोन कारचे नुकसान
बेळगाव : कोर्ट कंपाऊंड येथील जुनाट झाड रविवारी दुपारच्या सुमारास अचानक कोसळले. हे झाड जवळच असलेल्या दोन कारवर कोसळल्याने वाहनांचे नुकसान झाले आहे. दुपारनंतर हे झाड हटविण्याचे काम सुरू होते. शोभेच्या झाडाच्या भोवताली काँक्रिट घालण्यात आल्याने ते झाड काही दिवसांपासून सुकू लागले होते. रविवारी दुपारी वाऱ्यामुळे हे झाड कोसळले. सुदैवाने रविवार असल्याने परिसरात वर्दळ नव्हती. परंतु दोन कारवर हे झाड कोसळले. दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून वाहने बाजूला काढण्यासाठी प्रयत्न सुरू होते.









