सातारा / विशाल कदम :
वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे सातारा जिल्ह्यात महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून तब्बल ४३ हजार २३३ झाडे लावण्यात येणार आहेत. त्या झाडांच्या लागणीचे आणि संवर्धनाचे सर्व सूक्ष्म नियोजन सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केले आहे. त्याचबरोबर लावण्यात येणाऱ्या सर्व झाडांवर ट्री अॅपच्या माध्यमातून बॉच राहणार आहे. प्रत्येक तीन महिन्याचे अपडेट त्यावर द्यायचे असून त्या दिलेल्या माहितीची तपासणी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष जाग्यावर जावून करायची आहे. त्यामुळे लावलेली झाडे जगली आहेत का हे हे समजणार आहे.
सातारा जिल्ह्यात यावर्षी शासनाच्यावतीने ४३ हजार २३३ झाले लावण्याचे नियोजन असून त्या कामास सुरुवात झाली आहे. लावण्यात येणाऱ्या झाडांग झाडांमध्येही झाड कोणत्या प्रकारचे असेल, ते किती उंचीचे असेल, लावताना खड्डा किती उंचीचा असावा, किती रुंदीचा असावा त्याची सर्व नियमावली घालूनच वृक्षारोपणास सुरवात झाली आहे. मंत्री शिवेंद्रराजे यांच्या हस्ते प्रत्यक्ष या वृक्षरोपणाला प्रारंभ झाला आहे. त्यानुसार जिल्ह्यात बांधकाम विभागासह इतर विभागाकडून झाडांचे रोपण करण्यास सुरुवात केली आहे. तर लावलेल्या झाडांचे निगा राखून ती जगवण्यासाठीही एक स्वतंत्र्य यंत्रणा तयार केली आहे. त्याचबरोबर त्यावर लक्ष ठेवण्यासाठी ट्री अॅप तयार केले आहे. त्या अॅपच्या माध्यमातून दर तीन महिन्याला अपडेट घेण्यात येणार आहेत. झाडाचे फोटो अक्षांश रेखांश असलेले तेथूनच लाईव्ह टाकण्यात येणार आहेत. त्याचे क्रास व्हेरिफिकेशन करण्याची जबाबदारी शाखा अभियंता, उपअभियंता, कार्यकारी अभियंता यांची असणार आहे. त्यामध्ये लावण्यात येणाऱ्या झाडाची उंची ही ८ ते १० फुट, घेर ९ ते १० सेमी, वय ३ वर्ष असावे, झाड लावताना २०२ फुटाचा खड्डा घेतल्याचा फोटो आणि प्रत्येक फोटोत रस्ता घेणे बंधनकारक आहे. खते, पाणी दिल्याचे नियोजन केल्याचे फोटो अपलोड त्या अॅपवर बंधनकारक आहे. अधिकाऱ्यांनाही जागेवरच जावून व्हेरीफेकशन करावे लागणार आहे. ऑफिसमधून व्हेरिफिकेशन होणार नाही.
- प्रत्येक झाड जगवण्याचा आमचा प्रयत्न
शासनाने जे निर्देश दिले आहेत. त्यानुसार सातारा जिल्ह्यात प्रत्येक लावलेले झाड जगवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याकरता सुक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक झाडावर आमचे वैयक्तिक लक्ष राहणार आहे. त्या झाडाचे संरक्षण, त्या झाडाला खतपाणी दिले जाते काय याचीही माहिती घेतली जात आहे.
– श्रीपाद जाधव, अभियंता








