वृत्तसंस्था / ऑस्ट्रेलिया
भारत-पाक संघर्षविरामानंतर पुन्हा सुरू झालेल्या आयपीएलमध्ये सनराझर्स हैदराबादचा स्फोटक फलंदाज ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडला कोरोनाची लागण झाल्याने तो भारतात परतलेला नाही. सनरायझर्ससाठी हा मोठा धक्काच आहे.
भारत-पाक संघर्षामुळे 9 मे रोजी आयपीएलला स्थगिती देण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला होता. 17 मे पासून त्याची पुन्हा सुरुवात झाली असून आरसीबी व केकेआर यांचा सामना पावसामुळे होऊ शकला नाही. स्थगिती दिल्यानंतर प्रत्येक फ्रँचायझीतील अनेक विदेशी खेळाडू मायदेशी परतले होते. स्पर्धा पुन्हा सुरू झाल्यानंतर त्यातील काही खेळाडू पुन्हा भारतात परतले आहेत. मात्र कोरोनाची लागण झाल्यामुळे हेड भारतात आला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या संदर्भातील माहिती सनरायझर्सचे प्रमुख प्रशिक्षक डॅनियल व्हेटोरी यांनी दिली. यामुळे हेडला उर्वरित सामन्यांना मुकावे लागणार आहे. 19 मे रोजी सनरायझर्सचा लखनौ सुपर जायंट्सशी होणार आहे.









