Mumbai-Solapur Vande Bharat : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वकांक्षी योजना असलेली वंदे भारत एक्सप्रेस लवकरच मुंबई ते सोलापूर व्हाया पुणे व शिर्डी अशी धावणार आहे.त्यासाठी राज्यभरात चाचणी घेण्यात आली. तर येत्या १० फेब्रुवारीला वंदे भारत एक्सप्रेसचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
नवीन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी)स्टेशनहून सुटेल.ही गाडी मुंबई, पुणे आणि शिर्डीमार्गे सोलापूरकडे रवाना होईल. मुंबई ते पुणे हे अंतर केवळ १ तास ५० मिनिटात पूर्ण केले जाणार आहे. दरम्यान वंदे भारत ट्रेनचे तिकीट दर समोर आले आहेत. कसे असणार आहेत हे दर जाणून घेऊया.
वंदे भारत ट्रेनचे तिकीट दर
मुंबई ते पुणे चेअर कारसाठी ५६० रुपये आणि एक्झिक्यूटिव्ह कोर्टसाठी ११३५ रुपये.
मुंबई ते नाशिकसाठी चेअर कार ५५० रुपये तर एक्झिक्यूटिव्ह कोर्टसाठी ११५० रुपये.
मुंबई ते शिर्डी चेअर कार ८०० रुपये तर एक्झिक्यूटिव्ह कोर्टसाठी १६३० रुपये.
मुंबई ते सोलापूर चेअर कारसाठी ९६५ रुपये तर एक्झिक्यूटिव्ह कोर्टसाठी १९७० रुपये.
वंदे भारत एक्सप्रेस दादर, ठाणे आणि नाशिकरोड येथे थांबेल. इगतपुरी ते पुणतांबा दरम्यान ही ट्रेन ताशी ११० किमी वेगाने धावेल.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









