प्रवास होणार अधिक सोयीस्कर : हॉटेल रामदेवसमोर उद्घाटन
बेळगाव :
ट्रॅव्हल एक्स्पेडिया या ट्रॅव्हल सोल्यूशन्स कंपनीने बेळगावातील नवे कार्यालय अधिकृतरीत्या सुरू केले आहे. नेहरूनगर येथील पै कम्पाऊंड, हॉटेल रामदेवसमोर असलेल्या या कार्यालयाचे उद्घाटन दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर झाले. मुख्य अतिथी म्हणून डॉ. सुरेश पट्टेड व बेळगाव विमानतळाचे संचालक एस. त्यागराजन हे अतिथी म्हणून उपस्थित होते. या भव्य सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात ट्रॅव्हल एक्स्पेडियाचे व्यवस्थापक सागर वासवानी यांनी ‘ड्रीम, एक्सप्लोर, डिस्कव्हर’ या ध्येयवाक्याची माहिती देत प्रवास अधिक सोपा, स्मार्ट आणि सर्वांसाठी सहज उपलब्ध करून देण्याची भूमिका स्पष्ट केली.
नव्या कार्यालयातून प्रवाशांना सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय तिकीट बुकिंग विमान, रेल्वे व बस प्रवासासाठी, हॉलिडे पॅकेजेस कुटुंब, हनिमून व कॉर्पोरेट ग्रुपसाठी खास योजना, हॉटेल आरक्षण अग्रगण्य हॉटेल्ससोबत भागीदारी, व्हिसा व पासपोर्ट साहाय्य आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी तज्ञ मार्गदर्शन, प्रवास विमा सुरक्षित प्रवासासाठी संपूर्ण कवच, 24/7 ग्राहक सेवा, शेवटच्या क्षणी प्रवासाबाबत होणारे बदल व लागणारी आपत्कालीन मदत या कंपनीतर्फे पुरविली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
नेहरूनगरातील हॉटेल रामदेवसमोर असलेले हे कार्यालय बेळगावातील नागरिकांसाठी सहज पोहचण्याचे ठिकाण आहे. अनुभवी प्रवास सल्लागार कर्मचारी यामुळे प्रवाशांना संपूर्ण सेवा मिळणार आहे. ग्राहकांना आता प्रवासाची प्रत्येक गोष्ट वाहतूक, निवास व्यवस्था ते पर्यटन एका ठिकाणी नियोजन करता येणार असून वेळ वाचणार आहे आणि प्रवास निश्चिंत होणार आहे.
बेळगावातील प्रवासीसेवेला नवी दिशा
बेळगाव हे व्यापारी, शैक्षणिक व पर्यटन केंद्र म्हणून झपाट्याने विकसित होत आहे. वाढत्या प्रवाशांच्या गरजा लक्षात घेता ट्रॅव्हल एक्स्पेडियाचे नवे कार्यालय हे वारंवार प्रवास करणारे व्यावसायिक, विद्यार्थी व कुटुंबीयांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. कंपनीने बेळगावकरांना परवडणाऱ्या, विश्वासार्ह व ग्राहकपूरक प्रवास सेवा देण्याचे आश्वासन दिले आहे.









