Travelling Tips : आपल्य़ापैकी अनेकांना प्रवास खूप आवडत असतो. काहींना भारतातील ठिकाणांना भेट द्यायला आवडत असते तर काहींना भारता बाहेर प्रवास करायला आवडत असतो. अनेकांच स्वप्न असत की जीवनात एकदा तरी विमानाने प्रवास करावा. पण महागड्या विमान तिकीटांमुळे आपण विमानाने प्रवास करणे टाळतो. पण तुम्हाला माहिती आहे का की कित्येकदा आपल्या चुकांमुळेच आपण आपली फ्लाइट तिकीट महागडी करतो. हो, हे खरंय. आज आम्ही तुम्हाला विमानाचे स्वस्त तिकीट कसे बुक करावे, हे सांगणार आहोत.
-विमानाने प्रवास करताना सुरूवातीला तुम्ही बुकिंग करणाऱ्या साईट चेक करा. चेक करत असताना एकच नाही तर अनेक साईटना भेट द्या.
-तुम्ही पुन्हा पुन्हा तिकीट सर्च करता त्यावेळी इन्कॉग्नीटो मोड वापरा. जेणेकरून तुमची हिस्ट्री एअरलाइन्सला सापडणार नाही. बहूतेकदा एअरलाइन्स तुमची सर्च हिस्ट्री बघून तिकीटांची किंमत वाढवतात.
-त्याचबरोबर तुम्ही जितक्या लवकर तिकीट बुक कराल तितके ते तुम्हाला स्वस्त मिळू शकते.
-सणावारांमध्ये तिकीट महाग होऊ शकते त्यामुळे एक आठवडा शनिवार- रविवार सोडून इतर दिवसांसाठी तिकीट बुक करा. तुम्हाला ते अधिक स्वस्त मिळेल.
-अशा काही छोट्या टिप्सच्या मदतीने तुम्ही कमी पैशात विमानाने प्रवास करू शकता.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









