ताफ्यात 50 जुन्या बस : परिवहनच्या डोकेदुखीत वाढ
बेळगाव : परिवहनच्या ताफ्यात दाखल झालेल्या बीएमटीसी बसच्या नादुऊस्तीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक विस्कळीत होऊ लागली आहे. प्रवाशांची गैरसोय होत असल्याने परिवहनची डोकेदुखीदेखील वाढली आहे. या जुन्या बस रस्त्यात बंद पडण्याचे प्रमाण वाढल्याने प्रवाशीही हैराण झाले आहेत. बीएमटीसीकडून कमी किमतीत खरेदी केलेल्या बसेस आता परिवहनसाठी डोकेदुखी ठरत आहेत. कोरोना काळात परिवहनला कोट्यावधी ऊपयांचा फटका बसला आहे. त्यामुळे परिवहन आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडले आहे. दरम्यान नवीन बस खरेदी करण्यासाठी पैशाची चणचण भासत आहे. अशा परिस्थितीत परिवहनने बीएमटीसीच्या जुन्या 50 बस खरेदी केल्या आहेत. दरम्यान या बसेस शहर आणि ग्रामीण भागातील विविध भागात धावत आहेत. मात्र आयुर्मान संपलेल्या या बसेस सेवा देताना नादुऊस्तीचे प्रमाण वाढले आहे. जवळजवळ 8 ते 9 लाख किलोमीटर धावलेल्या आणि भंगारात काढलेल्या बसेस परिवहनमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे वाहतुकीवर याचा परिणाम होऊ लागला आहे.
निधीअभावी परिवहनला बीएमटीसीच्या जुन्या बस खरेदी कराव्या लागल्या आहेत. मात्र याच बस आता परिवहनसाठी त्रासदायक ठरू लागल्या आहेत. शहर आणि ग्रामीण भागातील काकती, होनगा, वडगाव, अनगोळ, उचगाव, संतिबस्तवाड, हलगा, येळ्ळूर आदी भागात पाठविल्या जात आहेत. मात्र या बसेसचे आयुर्मान संपले आहे. त्यामुळे रस्त्यात बंद पडणे, ब्र्रेकफेल होणे, पंक्चर होणे, असे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे प्रवाशांचीदेखील गैरसोय होऊ लागली आहे. बिघाड झालेल्या बस पाठविल्या जात असल्याने सातत्याने रस्त्यात बंद होण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. त्यामुळे सुस्थितीत असलेल्या बस वाहतुकीसाठी पाठवाव्यात, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे. शहरातंर्गत प्रवाशासाठी दैनंदिन 142 हून अधिक बसेस धावत आहेत. यापैकी 50 बसेस जुन्या व आयुर्मान संपलेल्या आहेत. त्यामुळे वाहतूक करताना अडचणी येऊ लागल्या आहेत. बीएमटीसीकडून केवळ 1 लाख ऊपयाला बसेस खरेदी करण्यात आल्या आहेत. शिवाय किरकोळ दुऊस्ती आणि मॉडिफीकेशन करून त्या बेळगाव विभागात दाखल करण्यात आल्या आहेत. मात्र या आयुर्मान संपलेल्या बसेसना नादुऊस्तीचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे प्रवाशांनादेखील प्रवास करणे धोक्मयाचे बनू लागले आहे.बेळगाव-कट्टणभावी बस गुऊवारी मार्केट यार्डजवळ नादुऊस्त होऊन बंद पडली. त्यामुळे प्रवाशांना इतर वाहनांचा आधार घ्यावा लागला. या जुन्या बस सातत्याने बंद पडत असल्याने प्रवाशी हैराण झाले आहेत.
प्रवाशांची गैरसोय
एकीकडे सरकार बेंगळूरसाठी नवीन इलेक्ट्रिक बस देत आहे. मात्र दुसरीकडे उत्तर कर्नाटकातील बेळगावला जुन्या बस दिल्या जात आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. ग्रामीण भागातील प्रवाशांना त्रास सहन करतच प्रवास करावा लागत आहे.
– एन. आर. लातूर, (वकील)
बीएमटीसीकडून 50 बस खरेदी
शहरात बसेसची कमतरता असल्याने बीएमटीसीकडून 50 बस खरेदी करण्यात आल्या आहेत. या जुन्या बस दुऊस्त करून प्रवासासाठी वापरल्या जात आहेत. प्रवाशांची गैरसोय होणार नाही, यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहे.
-के. के. लमाणी (विभागीय संचार अधिकारी)









