काहीकाळ वीजपुरवठा ठप्प
बेळगाव : नेहरूनगर येथील 110 केव्ही विद्युत स्टेशनमध्ये 20 एमव्हीए ट्रान्स्फॉर्मरला बुधवारी अचानक आग लागली. यामुळे हिंडाल्को विद्युत स्टेशनमध्ये केला जाणारा वीजपुरवठा ठप्प झाला. 20 मिनिटांनी पर्यायी वीज केंद्रातून वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. यामुळे केपीटीसीएल कर्मचाऱ्यांची मात्र धावपळ उडाली. बुधवारी सकाळी 6.30 च्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. वीजपुरवठा ठप्प झाल्याने शहराच्या काही भागात अंधार पसरला. केपीटीसीएलच्या अधिकाऱ्यांनी पर्यायी मार्गाने श्रीनगर येथून वीजपुरवठा सुरळीत केला. काही काळ ही आग पेटत होती. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी ती विझविण्याचा प्रयत्न केला. आग लवकर आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.









