प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव उत्तर विभागाच्या कार्यक्षेत्रातील 23 पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. शनिवारी पोलीस महानिरीक्षक विकाशकुमार विकाश यांनी बदल्यांचा हा आदेश जारी केला आहे.
पोलीस मुख्यालयातील विनोद पुजारी यांची विजापूर ग्रामीण पोलीस स्थानकाला तर अथणीच्या पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मी बिरादार यांची विजापूर जलनगर पोलीस स्थानकात, बनहट्टीचे बसवराज यद्दलगु• यांची नंदगड पोलीस स्थानकात, बेटगेरी, जि. गदग येथील ए. अभिजीत यांची हुक्केरी पोलीस स्थानकात वर्णी लागली आहे.
जिल्हा पोलीस मुख्यालयातील शिवराज नायकवाडी यांची निपाणी ग्रामीण पोलीस स्थानकात, निपाणी शहर पोलीस स्थानकातील आनंद बी. यांची रायबाग पोलीस स्थानकात, पोलीस मुख्यालयातील एस. एच. पवार यांची विजापूर येथील गांधी चौक पोलीस स्थानकात, बैलहोंगलचे पोलीस उपनिरीक्षक नंदीश यांची दोडवाड पोलीस स्थानकात, रायबागच्या पोलीस उपनिरीक्षक ज्योती वालीकर यांची आदर्शनगर-विजापूर येथे बदली करण्यात आली आहे.









