28 निरीक्षक, 50 उपनिरीक्षकांचा समावेश : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्णय
पणजी : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोवा पोलीस खात्यातील 28 पोलीस निरीक्षक आणि 50 उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षक नेल्सन अल्बुकर्क यांनी पोलीस मुख्यालयातून काल बुधवारी याबाबतचा आदेश जारी केला आहे. येत्या काही महिन्यांतच लोकसभा निवडणुका होणार असल्याने राज्याच्या पोलीस खात्याने विविध महत्त्वाच्या पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक यांच्या या बदल्या केल्या आहेत. या वर्षातील सर्वात मोठ्या प्रमाणात एकाचवेळी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा हा आदेश निघाला आहे. बदली करण्यात आलेले पोलीस निरीक्षक पुढीलप्रमाणे (कंसात बदली झालेले ठिकाण) : मुरगावचे पोलीस निरीक्षक आल्वितो ए. रॉड्रिगीज (कोलवा पोलीस ठाणे), गोवा पोलीस वेलफेअर सोसायटी, आल्तिनो येथील पोलीस निरीक्षक अनंत ए. गावकर (आगशी), काणकोणचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत आर. गावस (सिक्युरिटी युनिट पणजी), एसबी सेंटर फोंडाच्या पोलीस निरीक्षक देवयानी सी. नाईक (अॅन्टी ह्युमन ट्राफिक युनिट, पणजी), वास्कोचे पोलीस निरीक्षक धीरज आर. देविदास (मुरगाव) येथे बदली करण्यात आली आहे.
फातोर्डाचे पोलीस निरीक्षक दितेंद्र बी. नाईक (रायबंदर), कोलवाचे निरीक्षक फिलोसाल्द एल. कॉस्ता (जीआरपीए कॉय), पणजी पोलीस मुख्यालयातील निरीक्षक गौतम ए. साळुंके (टीसी काणकोण), डिचोलीचे निरीक्षक गौरीश जी. मळीक (शापोरा किनारी पोलीस), हणजुणचे निरीक्षक गौरीश जी. रब (डिचोली), कोलवाचे निरीक्षक हरीश राऊत देसाई (काणकोण), टीसी काणकोणचे महेश एस. वेळीप (पणजी पोलीस मुख्यालय), साळगावचे निरीक्षक मिलिंद एम. भुईंबर (गोवा पोलीस वेल्फेअर सोसायटी, आल्तिनो) येथे बदली करण्यात आली आहे. सीबीआय रायबंदरचे निरीश्रक नाथन डी आल्मेदा (फातोर्डा), पणजीचे निरीक्षक निखिल पालयेकर (म्हापसा), म्हार्दोळचे निरीक्षक राघोबा कामत (जुने गोवे), टीसी दाबोळी विमानतळ निरीक्षक राहुल आर. धामसेकर (सिक्युरिटी युनिट पणजी), एसीबी दक्षताचे निरीक्षक रितेश एन. तारी (कोकण रेल्वे पोलीस ठाणे), म्हापशाचे निरीक्षक सिताकांत एन. नायक, (टीसी हणजुण), जीआरपी सीकॉय निरीक्षक सोमनाथ एल. माजिक (साळगाव), कोकण रेल्वे पोलीस ठाणेचे निरीक्षक सुनील वाय. गुडलर (कोलवा), बेतुल कोस्टल सिक्युरिटी पीएसचे निरीक्षक सुरज जी. सामंत (जीआरपी सीकॉय), शापोरा कोस्टल सेक्शनचे निरीक्षक टेरेन्स पी. वाझ (एससीआरबी पणजी), कोलवाचे निरीक्षक थेरॉन डिकॉस्टा (बेतुल कोस्टल सेक्शन पीएस), सिक्युरिटी युनिट पणजीचे निरीक्षक विजयकुमार एस. चोडणकर (पणजी), आगशीचे निरीक्षक विक्रम नाईक (दाबोळी विमानतळ), जीआरपी ए कॉयचे निरीक्षक विनायक एन. पाटील (एसबी सेंटर फोंडा) येथे बदली करण्यात आली आहे. जुने गोवाचे निरीक्षक योगेश सावंत यांची म्हार्दोळ येथे बदली करण्यात आली आहे. याशिवाय 50 उपनिरीक्षकांच्या बदल्या राज्याच्या विविध ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत.









