विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा निर्णय
बेळगाव : विधानसभा निवडणुका येत्या दोन ते तीन महिन्यांत होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यास प्रारंभ केला होता. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांबरोबरच आता पोलीस निरीक्षकांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. माळमारुती पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सुनील बी. पाटील यांची बदली हुबळी येथील सीसीबी विभागात करण्यात आली आहे. रामदुर्ग पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक हासनसाब डी. मुल्ला यांची बदली बेळगाव आयजीपी कार्यालयात झाली. एपीएमसी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ यांची बदली खानापूर येथील पीटीएस विभागात करण्यात आली आहे.
खडेबाजार पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर यांची बदली विजापूर जिल्ह्यातील डीएसबी विभागात झाली आहे. कित्तूर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक महांतेश होसपेट यांची जोयडा तालुक्यात करण्यात आली आहे. निपाणी पोलीस स्थानकाचे निरीक्षक संकमेश शिवयोगी यांची धारवाड जिल्ह्यातील गरग येथे बदली करण्यात आली आहे. सीईएन विभागाचे पोलीस निरीक्षक संजीव कांबळे यांची बदली विजापूर येथील सीईएन विभागात झाली. जिल्हा सीईएन विभागाचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांची बदली धारवाड येथील सीईएन विभागात केली आहे. बागेवाडी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक तुकाराम निलगार यांची बदली धारवाड येथील महिला पोलीस स्थानकामध्ये झाली आहे.
बैलहोंगल पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक पी. व्ही. सालीमठ यांची धारवाड ग्रामीण पोलीस स्थानकामध्ये बदली झाली आहे. खानापूर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक यांची बदली सिर्शी येथे झाली आहे. सीसीआरबीचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ बडगेर यांची बदली गुलबर्गा शहर पोलीस स्थानकामध्ये झाली आहे. सीटीएस विभागाचे पोलीस निरीक्षक यल्लनगौडा नावलगट्टी यांची गुलबर्गा येथील सीईएन विभागात बदली झाली आहे. बेळगाव येथील आयजीपी विभागातील पोलीस निरीक्षक काम पाहणारे सुनील नंदेश्वर यांची बदली गुलबर्गा येथील राघवेंद्रनगर या ठिकाणी झाली आहे. काकती पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक विजयकुमार सिन्नूर यांची गुलबर्गा येथील सुलेपट या पोलीस स्थानकामध्ये बदली झाली आहे. मारिहाळ पोलीस स्थानकाचे निरीक्षक महांतेश बस्सापूर यांची बदली शिमोगा येथील कोटे पोलीस स्थानकामध्ये झाली आहे.









