मुख्य जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सी. एम. जोशी यांच्यासह इतरांची बदली
प्रतिनिधी/ बेळगाव
जिल्हा न्यायाधीश यांच्यासह इतर न्यायाधीशांच्या बदल्यांचे आदेश बजावण्यात आले आहेत. मुख्य जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सी. एम. जोशी यांची बदली बेंगळूर येथील प्रिन्सिपल सिटी सिव्हिल जज म्हणून बदली झाली आहे. तर बेळगाव येथे मुख्य न्यायाधीश म्हणून मुरलीधर पी. बी. यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तीन वर्षानंतर न्यायाधीशांच्या बदल्या करण्यात येतात. त्यानुसार बेळगावमधील काही न्यायाधीशांच्या बदल्या इतरत्र झाल्या आहेत. पहिल्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश बसवराज यांची बदली गदग येथे मुख्य न्यायाधीश म्हणून झाली आहे. गोकाक येथील बारावे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश विजयकुमार आनंदशेट्टी यांची बेंगळूर येथे बदली झाली आहे. चौथे अतिरिक्त न्यायालयाचे न्यायाधीश वीरभद्र विजय नेर्ली यांची बेंगळूर येथे बदली झाली आहे. तिसरे अतिरिक्त न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत यांची बेंगळूर येथे बदली झाली आहे. सहावे अतिरिक्त न्यायालयाचे न्यायाधीश संध्याराव पी. यांची बदली तुमकूर येथे झाली आहे. आठवे अतिरिक्त न्यायालयाचे न्यायाधीश हेमंतकुमार सी. आर. यांची बदली बेंगळुरला झाली आहे. दहावे अतिरिक्त न्यायालयाचे न्यायाधीश वेंकटेश यांची बेंगळूर येथे बदली झाली आहे.
अकरावे अतिरिक्त जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश गुरुराज शिरोळ यांची बदली बेळगाव येथीलच दहावे अतिरिक्त न्यायालयात झाली आहे. पाचवे अतिरिक्त जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश रमाकांत चव्हाण यांची अकरावे अतिरिक्त जिल्हा न्यायालय बेळगाव येथे बदली झाली आहे. अशाच प्रकारे आणखी काही न्यायाधीशांच्या बदल्या झाल्या आहेत.









