थांबे कमी करूनही परिणाम शून्यच; प्रवाशांची होतेय रखडपट्टी
खेड / प्रतिनिधी
कोकण रेल्वे मार्गावरील थांबे कमी करूनही कोकण रेल्वेगाड्या विलंबाने धावत असल्याने पवाशांना रखडपट्टीला समोर जावे लागत आहे. कोकण रेल्वे व मध्य रेल्वेने शुन्य आधारित वेळापत्रक लागू करताना पŸसेंजर गाड्यांचे काही थांबे कमी करत त्यांचे रूपांतर एक्सपेसमध्ये केले. मात्र, तरीही रत्नागिरी-दिवा, सावंतवाडी-दिवा या 2 गाड्या उशिराने सुटत असल्याने पवाशांना तासन्तास स्थानकात तिष्ठत बसावे लागत आहे. रेल्वे अभ्यासक अक्षय महापदी यांनी ही बाब उघड केली आहे.
रत्नागिरी-दिवा पॅसेंजरला सदैव विलंब
रत्नागिरी येथून मुंबईला जाणारे पवासी रत्नागिरी-दिवा पŸसेंजर पकडण्यासाठी रातोरात स्थानक गाठून तेथेच ठाण मांडतात. मात्र, ही पŸसेंजर विलंबाने सुटत असल्याने पवाशांचे आणखीन हाल होतात. याशिवाय ही पŸसेंजर नेमकी कधी मार्गस्थ होईल, या बाबतही पवाशांना ध्वनीवर्धकाद्वारे कुठलीच कल्पना दिली जात नसल्याची बाब देखील समोर आली आहे. रत्नागिरी-दिवा पŸसेंजर सदानकदा विलंबाने धावत असल्याने त्या-त्या स्थानकात पवाशांचा खोळंबा होत असून या पकियेला पूर्णविराम मिळणार तरी कधी? असा पश्न उपस्थित केला जात आहे.
‘एर्नाकुलम-निजामुद्दीन’ साप्ताहिक आजपासून 20 एलएचबी डब्यांची धावणार
कोकण मार्गावर धावणाऱया एर्नाकुलम-निजामुद्दीन साप्ताहिक एक्स्प्रेसला कायमस्वरूपी 2 अतिरिक्त एलएचबी डबे जोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार 22655/22656 क्रमांकाची एर्नाकुलम-निजामुद्दीन साप्ताहिक एक्स्प्रेस 23 नोव्हेंबरपासून 20 एलएचबी डब्यांची धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने मंगळवारी सायंकाळी जाहीर केले. यापूर्वी ही एक्स्प्रेस 18 एलएचबी डब्यांची धावत होती. प्रवाशांनी सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
हापा-मडगावला एक स्लिपर श्रेणीचा डबा वाढवला
कोकण मार्गावर धावणाऱया 22908/22907 क्रमांकाच्या हापा-मडगाव एक्स्प्रेसला तात्पुरत्या स्वरूपात स्लिपर श्रेणीचा एक अतिरिक्त डबा वाढवण्यात आला आहे. त्यानुसार ही एक्स्प्रेस 23 रोजी व परतीच्या प्रवासात 25 नोव्हेंबर रोजी एक अतिरिक्त डब्याची धावणार आहे.
‘तेजस एक्सप्रेस’ही 25 पासून धावणार विजेवर
कोकण मार्गावर धावणारी सीएसएमटी मुंबई-मडगाव तेजस एक्सप्रेसही 25 नोव्हेंबरपासून विजेवर चालवण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने मंगळवारी सायंकाळी जाहीर केले. त्या पाठोपाठ आणखी 2 एक्सप्रेसही विद्युतशक्तीवर धावणार आहेत. 22115/22116 क्रमांकाच्या लोकमान्य टिळक टर्मिनस-करमाळी साप्ताहिक एक्सप्रेससह समावेश असून ही एक्सप्रेस 24 नोव्हेंबरपासून विजेवर धावणार आहे. या पाठोपाठ 22113/22114 क्रमांकाची लोकमान्य टिळक टर्मिनस-कोचुवेली साप्ताहिक एक्सप्रेसही 26 नोव्हेंबरपासून विजेवर चालवण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवास आणखी वेगवान व सुखकर होणार आहे.