1.72 लाख पुजाऱयांना मिळणार लाभ ः विहिंपसारख्या संघटना करणार मदत
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केंद्र सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाने पुजारी आणि धार्मिक विधींशी निगडित लोकांना प्रशिक्षित करत स्वयंरोजगाराशी जोडण्याची योजना तयार केली आहे. पुढील 18 महिन्यांमध्ये देशभरात 1.72 लाख पुजाऱयांना प्रशिक्षण देण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. पहिल्यांदाच विश्व हिंदू परिषदेसारख्या संघटनांही केंद्र सरकार प्रशिक्षणाच्या योजनेशी जोडत आहे. या संस्था प्रशिक्षणाशी निगडित गरजांची पूर्तता करणार आहेत. याकरता केंद्र सरकार त्यांना निधी पुरविणार आहे. प्रशिक्षण कार्यक्रमात किती रक्कम खर्च होणार हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.
पुजाऱयांच्या प्रशिक्षणासाठी देशभरात नोंदणी सुरू करण्यात आली आहे. मध्यप्रदेशात 2200 तर गुजरातमध्ये 632, छत्तीसगडमध्ये 209 आणि बिहारमध्ये 1400 जणांची नोंदणी झाली आहे. सर्वाधिक 56 हजार जणांनी नोंदणी तामिळनाडूत केली आहे.
दक्षिण भारतात पुजाऱयांच्या प्रशिक्षणाच्या अभ्यासक्रमाचा कालावधी 6 महिने निर्धारित करण्यात आला आहे. तर अन्य ठिकाणी 3-6 महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात येईल. पूजा, धार्मिक विधींमध्ये शिकविले जाणारे श्लोक अन् मंत्रांचा इंग्रजी तसेच हिंदी अनुवाद अद्याप शिकविणे शिल्लक असल्याने कालावधीत बदल असणार आहे.
हिंदी भाषिक क्षेत्रात हिंदी अनुवाद शिकण्याची गरज नसेल, याचमुळे या भागांमध्ये अभ्यासक्रम तीन महिन्यांचा असेल. तर दुसरीकडे तामिळनाडू, तेलंगणा समवेत दक्षिणेतील अन्य राज्यांमध्ये हिंदी अनुवाद शिकण्यासाठी 3 महिन्यांचा अतिरिक्त कालावधी निश्चित करण्यात आला आहे. प्रशिक्षणाच्या विषयांमध्ये ऑनलाइन पूजा देखील सामील आहे याकरता एक आठवडय़ाचे प्रशिक्षण असणार आहे. आगामी काळात ऑनलाइन पूजा करविण्याचे प्रमाण वेगाने वाढणार असल्याने पुजाऱयांनी याकरता तयार असणे आवश्यक असल्याचे मंत्रालयाचे मानणे आहे. तर प्रशिक्षणाच्या तारखा अद्याप घोषित करण्यात आलेल्या नाहीत.
पुजाऱयांना प्रशिक्षणानंतर एक प्रमाणपत्र प्रदान पेले जाणार आहे. याची पूर्ण माहिती सामायिक वेबसाइटवर मिळणार आहे. प्रशिक्षण प्रदान करणाऱया संस्था पुजाऱयांना विविध शेणींमध्ये विभागून क्लस्टर तयार करण्यास सरकारला मदत करतील. यामुळे लोकांना या पुजाऱयांकडून सेवा प्राप्त करणे सोपे ठरणार आहे.









