मराठा मंडळ, साई स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे आयोजन
बेळगाव : बेळगाव मधील प्रसिध्द शिक्षण संस्था मराठा मंडळ खानापूर तालुका व साई स्पोर्ट्सतर्फे शाळेतील विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी नवीन स्केटिंग रिंक व क्रिकेट आणि फुटबॉल टर्फ मैदानावर, टेबल टेनिस व घोडेस्वारच्या प्रशिक्षण शिबिराला सुरवात करण्यात आली. मराठा मंडळच्या अध्यक्षा राजश्री नागराजू यांच्या मार्गर्शनाखाली खानापूर तालुक्यातील गोरगरीब व होतकरू तसेच इतर सर्वांना या खेळांचा उपयोग व्हावा म्हणून या सर्व मैदानांची निर्मिती करण्यात आली आहे. या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन माजी आमदार अरविंद पाटील, अविनाश पोतदार व युवा नेते किरण जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी अविनाश पोतदार यांनी सर्व मैदानांची प्रशंसा करून खानापूर तालुक्यातील सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन शिबिराला जमलेल्या पालकांना केले व मराठा मंडळ व साई स्पोर्ट्सचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी आमदार संजय पाटील, मराठा मंडळच्या अध्यक्षा राजश्री नागराजू, उमेश कलघटगी, अशोक गोरे, अंनत वाझ, सावीओ परेरा, पंडित ओगले, सुधीर हलगेकर, संयोगिता हलगेकर, युवा नेते जयराज हलगेकर, जयंत जाधव, संदीप जाधव, साई स्पोर्ट्सचे संचालक प्रसाद जाधव, राजलक्ष्मी जाधव, सुर्यकांत हिंडलगेकर, खानापूर तालुक्यातील मान्यवर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रम प्रसंगी स्केटिंग, क्रिकेट व फुटबॉल, घोडेस्वारचे प्रशिक्षक, संजय ढवळे, तेजस पवार, ऋषीकेश पसारे, या सर्वाचा गौरव करण्यात आला. यावेळी बेलगाम जिल्हा रोलर स्केटिंग असो.चे स्केटर्स, पालक व मराठा मंडळ व साई स्पोर्ट्स चे संचालक व इतर मान्यवर उपस्थित होते.









