बेंगळूर : तांत्रिक बिघाडामुळे बेंगळूरच्या एचएएलचे प्रशिक्षणासाठी असलेले हलके विमान चामराजनगरजवळील बोगापुराजवळ कोसळल्यामुळे आग लागली. सुदैवाने तेजपाल आणि भूमिका हे दोन पायलट बचावले आहेत. गुरुवारी दुपारी बेंगळूर येथील एचएएल विमानतळावरून चामराजनगरमार्गे प्रशिक्षणासाठी जात असताना उ•ाणाच्या दरम्यान तांत्रिक बिघाडामुळे इंजिनला आग लागली आहे. यावेळी दोन्ही वैमानिक पॅराशूटच्या सहाय्याने तात्काळ बाहेर उडी मारल्याने बचावले आहेत. एचएएलचे हे हलके विमान गुरुवारी दुपारी 12.30 च्या सुमारास उ•ाण करत होते. फ्लाईट लेफ्टनंट तेजपाल यांनी भुमिकाला प्रशिक्षण देत होते. त्यावेळी इंजिनला आग लागली. दोघांनी पॅराशूटच्या साहाय्याने बाहेर उडी मारताच विमान कोसळले आणि आग लागली. दोन्ही जखमी वैमानिकांना कमांडो ऊग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच एचएएलचे अधिकारी आणि पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास केला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









