जयसिंगपूर प्रतिनिधी
कोल्हापुरहून मिरजेकडे जाणारी रेल्वे गाडी नं. 01544 दुपारी बाराच्या सुमारास जयसिंगपूर याठिकाणी पोहोचताच रेल्वे अधिकाऱ्यांनी रेल्वे थांबवून वरिष्ठ व डिव्हीजनल विभागाला भ्रमणध्वनीवरुन सुचना दिल्या की, ट्रॅक्टरने रेल्वेला धडक दिली आहे. यामध्ये चार ते पाचजणांचा मृत्यु झालेला आहे. तर दोन डबे रुळावरुन घसरले आहेत, असा अलर्ट सुचना देत अपघातासाठी यंत्रणा तात्काळ पाठविण्यात यावी, यासाठी सुचना देण्यात आल्या. यावेळी एक तासानंतर अॅक्सिडन्ट रिलिफ बॅन घटनास्थळी दाखल झाले. तसेच सांगली-कोल्हापूरहून अॅब्युलन्स पोलिस देखील दाखल झाले. रेल्वे प्रशासन इंजिनिअरींग डिपार्टमेंटचे दिपक कुमार घटनास्थळी येवून विचारणा केली. आरबीएफचे अधिकारी, मेडिकल विभागाचे अधिकारी याठिकाणी दाखल झाले. जवळपास २५ मिनिटे रेल्वे थांबली होती. यानंतर प्रत्यक्षात हा अपघात नसून मॉक ड्रील असल्याचे समजले.
अपघातानंतर रेल्वे यंत्रणा व प्रशासन पोलिस यंत्रणा प्रवाशांना कितपत वेळेत सेवा देतात आणि सुरक्षा कशा पध्दतीने देतात याचे प्रात्यक्षिक यावेळी घेण्यात आले. रेल्वे विभाग किती सज्ज आहे, हे पाहण्यासाठी प्रात्यक्षिक घेण्यात आले. यावेळी गेटमन बी. एफ. रायण्णावर यांच्यासह विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.