लाहोर
पाकिस्तानात पुन्हा एकदा रेल्वेदुर्घटना घडली आहे. रविवारी पॅसेंजर रेल्वेचे 4 डबे अचानक रुळावरून घसरले. या दुर्घटनेत एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून 20 हून अधिक जण जखमी झाले आहेत. या जखमींपैकी 2 जणांची प्रकृती अत्यंत नाजूक आहे. ही दुर्घटना पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात घडली आहे. लोधरान रेल्वेस्थानकानजीक रेल्वेचे डबे रूळावरून घसरले. ही रेल्वे पेशावर येथून कराचीच्या दिशेने जात होती. या दुर्घटनेनंतर 19 प्रवाशांना वाचविण्यात आल्याचे सांगण्यात आले.









