Train Accident : पश्चिम बंगालमधील बांकुरा येथील ओंडा येथे दोन मालगाड्यांची धडक होऊन रेल्वे अपघात झाला. या अपघातात अनेक डबे रुळावरून घसरले. या घटनेत एक चालक जखमी झाला असून प्लॅटफॉर्म आणि सिग्नल रुमचे नुकसान झाले आहे. आज (रविवारी) सकाळी हा अपघात झाला. दोन मालवाहू गाड्यांच्या एका इंजिनसह 6 डबे रुळावरून घसरले आहेत.
पहाटे ४ वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे आद्रा-खड़गपूर शाखेवरील गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली. स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बांकुराहून येणारी दुसरी मालगाडी ओडा रेल्वे स्थानकाजवळील लाइनवर उभ्या असलेल्या मालगाडीच्या मागील बाजूस धडकली. धडक इतकी भीषण होती की, एका इंजिनसह दोन मालगाडीचे 6 डबे रुळावरून घसरले.
उभ्या असलेल्या मालगाडीला धडकली
घटनास्थळी पोहोचल्यानंतर स्थानिक नागरिकांनी चालकांना वाचवले. उत्तर अंबाला मंडल याठिकाणी हिसार-रायपूर हरियाणा रेल्वेच्या मधील पटरीवरून ट्रेन घसरल्याने हा अपघात झाल्याचे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, दुसऱ्या एका मालगाडीने थांबलेल्या मालगाडीला धडक दिली.ही धडक इतकी भीषण होती की, मालगाडीचे इंजिन थांबलेल्या वाहनावर चढले.आवाज ऐकून स्थानिक नागरिक घटनास्थळी पोहोचले.
असा अपघात झाला
रविवारी सकाळी बांकुराच्या ओंडा स्टेशनच्या लूप लाइनवर एक मालगाडी बिष्णुपूरच्या दिशेने उभी होती.दरम्यान,बांकुराहून विष्णुपूरकडे जाणारी दुसरी मालगाडी लूप लाइनमध्ये घुसली.चालती मालगाडी थांबलेल्या मालगाडीच्या मागील बाजूस धडकली.वेग जास्त असल्याने त्याचे इंजिन दुसऱ्या मालगाडीच्या वर चढले. यामुळे अनेक डबेही कलंडले.









