ओटीटी प्लॅटफॉर्मची क्रेझ वाढल्यावर इंग्रजी सीरिज पाहणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. ओटीटी प्रेमी अनेकदा काही हिट सीरिजच्या नव्या सीझनची प्रतीक्षा करत असतात. यात जनरेशन व्ही सीरिजचे नाव सामील आहे. सध्या याच्या दुसऱ्या सीझनची चर्चा सुरू आहे, निर्मात्यांनी आता या दुसऱ्या सीझनचा ट्रेलर जारी केला आहे. या बहुप्रतीक्षित सीरिजच्या ट्रेलरमध्ये प्रेक्षकांना स्वत:च्या पसंतीच्या पात्रांची झलक दिसून आली आहे. द बॉयज युनिव्हर्सचा पॅमियो यातही दिसून आला आहे. ट्रेलरमध्ये दुसऱ्या सीझनमध्ये शाळा पुन्हा सुरू झाली असून एकीकडे उर्वरित अमेरिकन होमलँडरच्या कठोर शासनानुसार वागत आहेत, तर गोडॉल्किन विद्यापीठात नवा डीन एका नव्या अभ्यासक्रमाचा प्रचार करत असून जो विद्यार्थ्यांना पूर्वीपेक्षा अधिक शक्तिशाली करण्याचे आश्वासन देत असल्याचे दिसून येते. जनरेशन व्हीच्या या सीझनमध्ये कॅट आणि सॅम प्रसिद्ध हिरो आहेत, तर मॅरी, जॉर्डन आणि एम्मा या कॉलेजमध्ये परतत असल्याचे दिसून येते. सीरिजच्या नव्या सीझनमध्ये कॅम्पसबाहेर आणि आत माणूस आणि सुपरमॅनदरम्यान पेटलेला संघर्ष दाखविण्यात येणार आहे. या दुसऱ्या सीझनचे 3 एपिसोड्स 17 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहेत. ही बहुप्रतीक्षित सीरिज अमेझॉन प्राइम व्हिडिओवर पाहता येणार आहे.









