प्रेमाच्या धर्मसंकटात रश्मिका
‘थामा’ चित्रपटातील पिशाच्चांशी निगडित कहाणीत काम केल्यावर रश्मिका मंदाना एका वेगळ्या कहाणीजगतात पाऊल ठेवत आहे. प्रेम, गुंतागुंत आणि भावनात्मक उलथापालथीने युक्त ही कहाणी आहे. तिचा आगामी चित्रपट ‘द गर्लफ्रेंड’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. स्वत:च्या प्रियकरावर मी खरोखरच प्रेम करते का केवळ त्याच्या विचारावर, असा प्रश्न उद्भवलेल्या युवतीची भूमिका ती साकारत आहे.
राहुल रविंद्रन यांच्या दिग्दर्शनात निर्मित या चित्रपटात रश्मिका मंदानासोबत दीक्षित शेट्टी मुख्य भूमिकेत आहे. ट्रेलरची सुरुवात रश्मिकाची व्यक्तिरेखा भूमापासून होते, जी घाबरून स्वत:चा प्रियकर विक्रमला एक छोटा ब्रेकअप घ्यावा अशी सूचना करते. तर भूमा आपल्यासाठी योग्य जोडीदार असल्याचे विक्रमचे मानणे असते. परंतु भूमा यावरून गेंधळात पडलेली असते.
ट्रेलरच्या प्रारंभी कहाणीत रश्मिका आणि दीक्षितला परस्परांच्या प्रेमात बुडालेले दाखविण्यात आले आहे. कहाणीत लवकरच एक वेगळे वळण येते, जे तणावयुक्त संभाषण, मतभेद, कौटुंबिक कलह, संताप आणि शंकांनी वेढलेले असते. अखेरीस रश्मिका मंदानाची व्यक्तिरेखा स्वत:चे नाते आणि गर्लफ्रेंड होण्याच्या टॅगवर प्रश्न उपस्थित करताना दिसून येते. ‘द गर्लफ्रेंड’ या चित्रपटाला हेशाम अब्दुल वहाबने संगीत दिले आहे.रश्मिका मंदानाचा हा चित्रपट 7 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.









