‘द बंगाल फाइल्स’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहेश. विवेक रंजन अग्निहोत्रीकडून दिग्दर्शित हा चित्रपट पश्चिम बंगालच्या हिंसक राजकारणाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे.
याची कहाणी बंगालच्या फाळणीशी निगडित संकटावर आधारित असून यात हिंदूंच्या नरसंहाराला मोठ्या पडद्यावर साकारण्यात आले आहे. चित्रपट सत्यघटनांवर आधारित आहे. ट्रेलरमध्ये एक संवाद असून ‘हा पश्चिम बंगाल आहे, येथे दोन संविधान चालतात, एक हिंदूंचा, एक मुस्लिमांचा’ असा याचा आशय आहे चित्रपटात मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी आणि दर्शन कुमार हे कलाकार दिसून येणार आहेत. याचबरोबर अनुपम खेर महात्मा गांधींच्या भूमिकेत दिसतील. तर मदालसा शर्मा आणि सिमरत कौरही यात झळकणार आहेत. ‘द बंगाल फाइल्स’ या चित्रपटाची कहाणी विवेक अग्निहोत्री यांनीच लिहिली आहे. ‘द बंगाल फाइल्स’ हा एक वेक-अप कॉल आहे, बंगालला आम्ही दुसरे काश्मीर होऊ देणार नाही याची ही एक गर्जना आहे. राष्ट्राला तयार रहावे लागेल, कारण जर काश्मीरने तुम्हाला ईजा पोहोचविली असेल, तर बंगाल तुम्हाला त्रस्त करणार आहे असे उद्गार विवेक अग्निहोत्री यांनी काढले आहेत. हा हा लक्षवेधी चित्रपट 5 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.









