ऑटिस्टिक मुलीच्या स्वप्नांचे उड्डाण मांडणारी कथा
अनुपम खेर यांचा चित्रपट ‘तन्वी द ग्रेट’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात अनुमप खेर हे दिग्दर्शक म्हणून पुनरागमन करत आहेत. तन्वी द ग्रेट चित्रपटाची कहाणी ऑटिज्म डिसऑर्डरने पीडित मुलीची कहाण आहे. तिचा निर्धार पाहून प्रत्येक जण थक्क होत असतो. या चित्रपटात शुभांगी दत्त मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. जगाच्या नजरेत कमजोर असलेली ही मुलगी स्वत:चा आवाज निडर अन् मजबूतपणे उठवत असते. शारीरिक कमजोरी तुम्हाला पुढे जाण्यापासून रोखू शकत नाही हे या चित्रपटात दाखविण्यात आले आहे.
अनुपेम खेरकडून दिग्दर्शित या चित्रपटाच्या ट्रेलरने कान फिल्म फेस्टिव्हल, न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल, लंडन, ह्यूस्टन आणि अनेक अन्य ठिकाणी कौतुक मिळविले आहे. तन्वी द ग्रेट चित्रपट पाहणारा प्रत्येक व्यक्ती काहीसा दयाळू अन् बदललेला दिसून येईल. ही एक ऑटिस्टिक, प्रतिभाशाली युवतीची कहाणी आहे, जी भारतीय सैन्यात सामील होण्याचे स्वप्न पाहेत. हा माज्या कारकीर्दीतील सर्वात महत्त्वपूर्ण चित्रपटांपैकी एक आहे असे उद्गार अनुपम खेर यांनी काढले आहेत.
या चित्रपटात शुभांगी, जॅकी श्रॉफ, अरविंद स्वामी, बोमन इराणी, पल्लवी जोशी, करण टैकर, नासिर, अनुपम खेर आणि इयान ग्लेन सामील आहेत. हा चित्रपट 18 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाला एम.एम. किरवाणी यांचे संगीत लाभले आहे.









