
परेश रावलचा बहुप्रतीक्षित कौटुंबिक चित्रपट ‘शास्त्राr विरुद्ध शास्त्राr’चा ट्रेलर जारी करण्यात आला आहे. नंदिता रॉय आणि शिबोप्रसाद मुखर्जी यांच्याकडून दिग्दर्शित या चित्रपटात मिमी चक्रवर्ती, अमृता सुभाष, मनोज जोशी, नीना कुलकर्णी आणि शिव पंडित यासारखे अनुभवी कलाकार दिसून येणार आहेत. हा चित्रपट 3 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. वायाकॉम 18 ने या चित्रपटाचा ट्रेलर जारी केला आहे. एका कुटुंबातील उतारचढाव अत्यंत बारकाईने आणि उत्तम पद्धतीने या चित्रपटात दर्शविण्यात आले आहेत. 7 वर्षीय मोमोजी या पात्राच्या अवतीभवती याची कहाणी घुटमळणारी असून तो भावनांच्या जाळ्यात अडकला असून आईवडिल आणि प्रेमळ आजीआजोबांदरम्यान अडकून पडला आहे. आईवडिल नेहमी योग्य असतात का, प्रत्यक्षात पालक होण्याचा हक्क कोणाला असे प्रश्न उपस्थित करणारा हा चित्रपट आहे. भावनात्मक उलथापालथ आणि कलाकारांचा सशक्त अभिनय रंजक अनुभव मिळवून देईल.









