शाहिद कपूरचा चित्रपट ‘देवा’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. ट्रेलरमध्ये शाहिद हा धमाकेदार अॅक्शन करताना दिसून येत आहे. या चित्रपटात त्याने पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. शाहिद कपूर पूर्ण ट्रेलरमध्ये धमाकेदार अॅक्शन आणि स्वत:च्या इंटेंस लुकसोबत दिसून येणार आहे. पोलीस अधिकाऱ्याची भूमिका शाहिदने उत्तमप्रकारे साकारल्याचे दिसून येत आहे. याचबरोबर चित्रपटाचे गाणे ‘भसड मचा’ सादर करण्यात आले आहे. या चित्रपटात शाहिदसोबत पूजा हेगडे ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहे.
शाहिदचा हा बहुप्रतीक्षित चित्रपट 31 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून शाहिदचा अॅक्शन अवतार त्याच्या चाहत्यांना पहायला मिळणार आहे. शाहिद अन् पूजासोबत या चित्रपटात पावेल गुलाटी, प्रवेश राणा आणि कुबैरा सैत हे कलाकारही दिसून येणार आहेत.









