राजकुमार राव, राधिका आपटे, हुमाचा चित्रपट
राजकुमार राव, राधिका आपटे आणि हुमा कुरैशीचा चित्रपट ‘मोनिका ओ माय डार्लिंग’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या तिन्ही कलाकारांचे डेडली कॉम्बिनेशन आणि मर्डर मिस्ट्री पाहून चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. वासन बाला यांच्या दिग्दर्शनात निर्मित ‘मोनिका ओ माय डार्लिंग’ हा डार्क कॉमेडी धाटणीचा चित्रपट आहे.
चित्रपटात सिकंदर खेर देखील झळकणार आहे. राधिका आपटे एका पोलीस अधिकाऱयाच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट 11 नोव्हेंबर रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची कथा योगेश चंडेकर यांनी लिहिली आहे. योगेश यांनीच ‘अंधाधुन’ चित्रपटाची कथा लिहिली होती.
अंधाधुन चित्रपटाचे मोठे कौतुक झाले होते. या चित्रपटासघ्टी आयुष्मान खुरानाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. तसेच चित्रपटाला सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी गौरविण्यात आले होते. त्या चित्रपटात आयुष्मान, राधिका आपटे आणि तब्बूसह अनेक कलाकार होते. विशेष म्हणजे त्या चित्रपटाचे दिग्दर्शनही वासन बाला यांनीच केले होते.









