युपीएससी एस्पायरेंट्सची मनस्पर्शी कहाणी
विधु विनोद चोप्रा यांनी स्वत:चा अकॅडेमिक ड्रामा चित्रपट ‘12 वीं फेल’ सादर केला आहे. या चित्रपटात युपीएससी एस्पायरेंट्सची कहाणी दर्शविण्यात येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर जारी करण्यात आला आहे. या चित्रपटात विक्रांत मैसी मुख्य भूमिकेत आहे. तो मनोज कुमार शर्मा ही भूमिका साकारत आहे. मनोज कुमार हा चंबळमधील एका गावातून दिल्लीच्या मुखर्जीनगरमध्ये युपीएससीच्या तयारीसाठी आलेला असतो. येथे येऊन शिक्षण सुरू ठेवण्यासाठी टॉयलेट साफ करण्यापासून अनेक छोटीमोठी कामे त्याला करावी लागतात. कुटुंब आर्थिकदृष्ट्या सशक्त नसल्याने त्याला स्वत:चा खर्च भागविण्यासाठी काम करावे लागते. युपीएससीच्या परीक्षेत वारंवार अपयशी ठरल्याने त्याचे मनोबल खालावलेले असते. युपीएससी एस्पायरेंट्सच्या अपयशातून यशाच्या दिशेने होणाऱ्या प्रवासाची कहाणी यात दिसून येणार आहे.
हा चित्रपट खऱ्याखुऱ्या घटनेवर आधारित आहे. चित्रपट अनुराग पाठक यांच्या ‘12 वीं फेल’ नावाच्या कादंबरीवर बेतलेला आहे. या कादंबरीत आयपीएस अधिकारी मनोज कुमार शर्मा आणि आयआरएस अधिकारी श्रद्धा जोशी यांचा प्रवास मांडण्यात आला आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण विद्यार्थ्यांच्या मदतीने पूर्ण करण्यात आले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विधु विनोद चोप्रा यांनी केले आहे. हा चित्रपट 27 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.









