दहशत फैलावण्यासाठी परतले जुने भूत
पॉप्युलर हॉरर फ्रेंचाइजी ‘द कोन्जूरिंग’ स्वत:च्या सीक्वेलसह परतली आहे. भूत परतण्यासह ही कहाणी आणखी भीतीदायक ठरली आहे. याला ‘द कोन्जूरिंग : लास्ट राइट्स’ नाव देण्यात आले आहे. निर्मात्यांनी आता याचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. प्रेक्षकांना हॉरर फ्रेंचाइजीचा ट्रेलर पसंत पडला असून ते आता हा चित्रपट पाहण्यासाठी आतुर झाले आहेत. हा चित्रपट 5 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या फ्रेंचाइजीचा हा अखेरचा भाग असून याचबरोबर ‘द कोन्जूरिंग’च्या भीतीदायक कहाणीचा अंत होणार आहे. एड आणि लॉरेनसाठी ‘द कॉन्जूरिंग : लास्ट राइट्स’ काही नवी गोष्ट नाही, त्यांनी याचा सामना यापूर्वीही केला आहे. आता हे भूत परतले असून त्यांच्या मुलीमागे पडले आहे. त्यांच्या मुलीची भूमिका मिया टॉमलिंसनने साकारली आहे. ट्रेलरचा प्रारंभ सामान्य लोक आणि हेरांच्या मुलाखतींनी होतो, ज्यात सैतान पेंसिल्वेनिया येथे पोहोचल्याचे दाखविण्यात आले आहे. 8 लोकांसोबत घरात काही ना काही घडत आहे. आता या 8 लोकांना कुठल्या न कुठल्या सावलीचा भास होत असल्याचे ट्रेलरमध्ये दाखविण्यात आले आहे. ‘द कोन्जूरिंग : लास्ट राइट्स’ अमेरिकन सुपरनॅचनल हॉरर चित्रपट आहे असून त्याचे दिग्दर्शन मायकल चाव्सने केले आहे. इयान गोल्डबर्ग, रिचर्ड निंग आणि डेव्हिडल लेस्ली जॉन्सन-मॅकगोल्ड्रिकने मिळुन याची कहाणी लिहिली आहे. चित्रपट वॉरेनच्या ट्रू लाइफ इन्व्हेस्टिगेशनवर आधारित आहे.









