करंजफेण वार्ताहर
गेल्या दोन दिवसांपासून कासारी नदीच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आसल्यामुळे बर्की धरण पाण्याखाली गेले आहे. पावसाचा जोर वाढत असल्याने पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.
गेल्या दोन दिवसांपासून शाहूवाडी दक्षिण भागातील कासारी नदीच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ झाल्याने कासारी नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. त्यामुळे कासारी नदीही धोक्या्च्या पातळीवरून वाहत आहे. बर्की धरण पाण्याखाली गेल्याने नदीच्या पलीकडील बर्की, बुराणवाडी, बर्की धनगरवाडा येथील लोकांचा संपर्क तुटला आहे.. पावसाचा जोर वाढल्यास नांदारी फाट्यावरील व करंजफेण कांटे दरम्यान असणाऱ्या वारंगमळी ओढ्यावरील मोरीवर पाणी येण्याची शक्यता आहे. तर, बर्की धबधब्याकडे जाणार्या् मार्गावर नदीचे पाणी आल्याने वाहतूक बंद झाली आहे. बर्की पुलावरून धोकादायकपणे पर्यटक धबधब्याकडे जाऊ नयेत म्हणून शाहूवाडी पोलीस स्टेशन कडून बंदोबस्त ठेवण्यात आला आहे पाणी ओसरेपर्यंत पर्यटकांना बर्कीला जाता येणार नाही.









