भाविकांचा भीषण अपघात १० प्रवाशांचा मृत्यू, १९ जण जखमी
प्रयागराज
प्रयागराज येथे महाकुंभमेळ्याला जाताना भाविकांवर काळाने घाला घातला. प्रवासात चालकाचे गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने, गाडी समोरून येणाऱ्या बसवर जाऊन धडकली आणि अपघात झाला. या भीषण अपघातात १० भाविकांचा मृत्यू झाला आहे, तर १९ भाविक जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींना जवळ्याच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातातील मृत्यू हे छत्तीसगड मधील रहिवासी आहेत.
हा अपघात मध्यरात्री घडला, यावेळी गाडीतील सर्व प्रवासी झोपलेले होते. अपघाताची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातातील मृतांना उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.
Previous Articleआभार मेळाव्यात आज ‘मेगा पक्षप्रवेश’
Next Article एकनाथ शिंदेच महायुतीच्या महाविजयाचे खरे शिल्पकार









