वाहतुकीला लागले वळण : वाहनधारकांना दिलासा
बेळगाव ; गोवावेस बसवेश्वर सर्कल येथील मागील काही दिवसांपासून बंद असलेला ट्रॅफिक सिग्नल पूर्ववत झाला आहे. त्यामुळे वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे. शिवाय वाहतूकही सुरळीत झाली आहे. सतत वर्दळ असलेल्या बसवेश्वर सर्कल येथील सिग्नल रस्ता दुरुस्तीच्या कामानिमित्त बंद ठेवण्यात आला होता. विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. दरम्यान, खोदाईमुळे केबल काढण्यात आल्या होत्या. त्यामुळे येथील सिग्नल मागील काही दिवसांपासून बंद होता. विकासकामे पूर्णत्वाकडे आल्यानंतर येथील सिग्नल पूर्ववत सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे वाहतुकीला वळण लागले आहे. सिग्नल बंद असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन समस्या निर्माण होत होती. मात्र, आता सिग्नलमुळे वाहनधारकांची गैरसोय दूर झाली आहे.









