विटा / सचिन भादुले :
विट्यातील वाढती वाहन संख्या शहरातील प्रत्येक रस्त्यावर वाहतूक कोंडी करत आहे. त्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकातच वाहतूक पोलिसांचे पथक अवजड वाहने अडवण्यात व्यस्त असते. यातील किती जणांवर प्रत्यक्ष कारवाई होते आणि कितीजण वाहनाच्या आडून ‘चर्चा’ करून सुटतात, याबाबत शहरातील कट्ट्यावर नेहमीच खुमासदार चर्चा असते.
शहरात पार्किंगची मोठी समस्या आहे. वाहतूकीला अडथळा होईल. अशी चारचाकी वाहने रस्त्यावर उभी केली जात आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. रस्त्यावर उभी केलेली चारचाकी वाहने मार्गरथ करण्यासाठी वाहतूक पोलिसांना ध्वनीक्षेपकांवर सूचना करावी लागत असल्याचे चित्र आहे.
त्यामुळे दररोज रस्त्यावरील वाहने मार्गस्थ करण्यासाठी वाहतूक पोलिसांना कसरत करावी लागत आहे. मात्र वाहतूक पोलिसांची ही कसरत मुख्य रस्त्त्यावरच असते. शहरातील रस्ते अरुंद असल्याने दुचाकी, चारचाकी पार्किंगचा मोठा प्रश्न आहे. पार्किंगसाठी आरक्षित असलेल्या जागा पालिकेने खुल्या करणे गरजेचे आहे. मात्र प्रत्यक्षात ते होताना दिसत नाही.
शहरातून विजापूर-गुहागर हा राष्ट्रीय महामार्ग व सांगली-भिगवण राज्यमार्ग गेला आहे. या मार्गावर वाहनांची मोठी रहदारी असते. या राष्ट्रीय व राज्यमार्गावर नगरपालिका व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी पांढरे पट्टे ओढले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून खानापूर, सांगली व मायणी रस्त्यावर ओढलेल्या पांढऱ्या पट्ट्यात दुचाकी पार्किंग केल्या जात आहेत पोलिस ठाण्याच्या संरक्षित भिंतीलगत नगरपालिकेने चारचाकी पार्किंग असा फलक लावला आहे. मात्र त्या पट्ट्यात चारचाकीऐ वजी दुचाकी पार्किंग केल्या जात आहेत.
चारचाकी लावण्यासाठी जागा नसल्याने चारचाकी वाहनधारक रस्त्यावरच गाड्या पार्किंग करत आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनांना अडथळा होऊन वाहतूक कोंडी होत आहे, रस्त्यावरील वाहने मार्गस्थ करण्यासाठी दररोज सकाळी ते सायंकाळपर्यंत चारचाकी वाहनातून ध्वनी क्षेपकांवरून वाहतूक मार्गरथ करण्याच्या सूचना द्याव्या लागतात.
शहरातील अंतर्गत ररते व उपनगरातही हीच अवरथा आहे. ररते अरुंद व त्यातच दुचाकी पार्किंग आहे. त्यामुळे अंतर्गत ररत्यांची बोळ तयार झाली आहेत.
सराफ कट्टा, शगुन कॉर्नर ते मॉडर्न एज्युकेशन सोसायटी कडे जाणारा रस्ता, पॉवर हाऊस रोड, उभी पेठ, गणेश पेठ, चौंडेश्वरी चौक, साळशिंगे रस्ता, अशा अनेक मार्गावरून वाहतुकीची कोंडी झालेली आढळून येते. मात्र जिथे खरी गरज आहे, अशा शाळा महाविद्यालयांच्या मार्गावर पोलिसांची गस्त कमीच आढळून येते.
संध्याकाळी शाळा महाविद्यालय सुटल्यानंतर त्या परिसरात वाहतूक पोलिसांची व्यवस्था आवश्यक आहे. मात्र त्याचवेळी वाहतूक पोलीस शिवाजी चौकात अवजड वाहनांना शिट्टी मारताना ठिय्या मांडून बसलेले दिसून येतात. त्यातही किती वाहनांवर प्रत्यक्ष कारवाई होते? याबाबत प्रश्नचिन्हच आहे








