वाकरे । प्रतिनिधी
बालिंगे पुलावरून सुरक्षिततेच्या कारणावरून गेले तीन दिवस बंद असलेला कोल्हापूर -गगनबावडा रस्ता आजपासून सुरू करण्यास पालकमंत्री दीपक केसरकर यांनी परवानगी दिली आहे. पण या पुलावरून दोन चाकी तसेच हलक्या चारचाकी वाहनांची एकेरी वाहतूकच होईल असेही ते म्हणाले असल्याची माहिती करवीरचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी दिली.
माजी आमदार नरके यांनी बुधवारी रात्रीपासून पालकमंत्री केसरकर यांच्याशी सातत्याने संपर्क साधून कोल्हापूर जिल्ह्याच्या करवीर, पन्हाळा, गगनबावडा, राधानगरी, शाहूवाडी तालुक्यातील जनतेची रस्ता बंद होत असल्याने होणारी गैरसोय लक्षात घेऊन हा रस्ता तातडीने सुरू करण्याची मागणी केली होती. आज पालकमंत्री दीपक केसरकर यांनी याबाबत निर्णय घेऊन हा रस्ता त्वरित सुरू करण्याची करण्यास परवानगी दिली आहे. तसेच या पुलावरून दोन चाकी तसेच हलक्या चारचाकी वाहनांची एकेरी वाहतूकीलाच परवानगी द्यावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. अशी माहिती नरके यांनी दिली आहे. माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या पाठपुराव्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी खुला झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. ४ पर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी खुला होणार आहे.









