इंधन संपल्याने कदंबा बस पडली बंद
खानापूर : खानापूर-जांबोटी रस्त्यावर दारोळीनजीक खानापूरहून गोव्याकडे जाणाऱ्या कदंबा बस क्र. जी. ए. 03-एक्स-0700 या बसमधील डिझेल संपल्याने ही बस दारोळीनजीक बंद पडली होती. बस रस्त्याच्या मधोमध बंद पडल्याने जांबोटी रस्ता अरुंद असल्याने समोरुन येणारे वाहन येण्यास जागा नसल्याने या रस्त्यावरील वाहतूक एक तासभर खोळंबली होती. कदंबा बसच्या वाहक आणि चालकाच्या गलथान कारभाराबाबत प्रवाशांतून आणि नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत होता. एक तासाभरानंतर डिझेलची व्यवस्था करून बस सुरू करण्यात आल्यानंतर हा रस्ता वाहतुकीस मोकळा करण्यात आला.









