ऑनलाईन टीम / पुणे :
मुंबई-बेंगळूर महामार्गावर पुण्याजवळ वाहतूक ठप्प झाली आहे. वडगाव बुद्रुक परिसरात रस्त्यांवर पडलेल्या मोठय़ा खड्डय़ांमुळे जवळपास 3 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
वडगाव बुद्रुक येथील मुठा नदी पुलापासून नवीन कात्रज बोगद्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. वडगाव, धायरी, नऱ्हे, आंबेगाव परिसरातील सर्व सेवा रस्तेही वाहतूक कोंडीमुळे ठप्प झाले आहेत. त्यामुळे वाहन चालक, नागरिक आणि विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. वारजे, सिंहगड आणि भारती विद्यापीठ पोलिसांच्यावतीने वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.








