नागरिक हैराण : समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेणे गरजेचे
बेळगाव : बेळगाव-बागलकोट राज्य महामार्गाच्या सहापदरीकरणाला सुऊवात झाली आहे. सध्या बेळगावकडून निलजीपर्यंतच्या रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हा रस्ता सहापदरीकरण होत असला तरी सध्या काम सुरू असल्याने रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागून कोंडी होत आहे. त्यामुळे येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. याठिकाणी पोलीस प्रशासनाने कायमस्वरुपी वाहतूक नियंत्रण पोलिसांची नेमणूक करावी, अशी मागणी होत आहे. बेळगाव-बागलकोट हा राज्य महामार्ग होणार आहे. सध्या हा रस्ता सांबऱ्यापर्यंत होणार असला तरी त्यापुढेही त्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या झाडांची कत्तल करण्यात आली आहे. आता बळ्ळारी नाल्यावरही नव्याने पुलाची उभारणी करण्यात येत आहे. हे काम जोरदार सुरू आहे. मात्र वाहतूक कोंडी होत असल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी तातडीने उपाययोजना राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.
य् ाा रस्त्याच्या दोन्ही बाजूला खोदाई करण्यात येत आहे. तर एकतर्फा वाहतूक सुरू करण्यात आल्याने वाहतुकीच्या कोंडीत मोठी भर पडत आहे. परिणामी याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. वारंवार वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनांच्या लांबचलांब रांगा लागत आहेत. यातून मार्ग काढणे कठीण जात आहे. ही समस्या आता रस्ता होईपर्यंत नित्याचीच होणार आहे. मात्र यासाठी पर्यायी प्रयत्न होण्याची गरज निर्माण झाली आहे. य् ाा रस्त्याचे सहापदरीकरण करण्यासाठी मोठा निधी मंजूर झाला आहे. या कामाला गती आली असून अनेक ठिकाणी रस्ता खोदाई करून भरती टाकण्यात येत आहे. दोन्ही बाजूची झाडे काढण्यात आली आहेत. गांधीनगर, बसवण कुडची, शिंदोळी माळ तसेच निलजीपर्यंतच्या कामाला गती दिली आहे. मात्र या मुख्य रस्त्यावर कोंडी होत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष झाले असून पोलिसांनी लक्ष देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. बळ्ळारी नाल्यावर आणखी एका पुलाची उभारणी करण्यात येणार आहे. त्याच्या कामकाजाला सुऊवात झाली आहे. या रस्त्याचे सहापदरीकरण होणार असल्याने अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्यात आल्या आहेत. याचबरोबर काही इमारतीही काढाव्या लागणार आहेत. दरम्यान, सपाटीकरणाचे काम सुरू आहे. मात्र रस्त्याच्या दोन्ही बाजूला काम सुरू असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. एकतर्फा मार्ग सुरू असल्याने वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यातच अवजड वाहतूकही मोठ्या प्रमाणात होते. याकडे लक्ष देऊन ही समस्या सोडवावी, अशी मागणी होत आहे.









