बेळगाव प्रतिनिधी : तिसरे रेल्वे फाटकावर उड्डाणपुलाचे बांधकाम करण्यात येत असल्याने गेल्या चार वर्षापासून येथील एका बाजूचा रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात आला आहे. अशातच आता दुसऱ्या बाजूच्या रस्त्यावर जलवाहिन्या घालण्यासाठी खुदाई सत्र सुरू असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. रस्त्यावरून
पादचाऱ्यांना ये-जा करणे मुश्किल बनले आहे. एल अँड टी च्या अनियोजन कामाबद्दल शहरात तक्रारी सुरू आहेत. अशातच आता खानापूर रोड परिसरात जलवाहिन्या घालताना कोणतेच नियोजन करण्यात आले नाही. याचा फटका वाहनधारक आणि सर्वसामान्य नागरिकांना सोसावा लागत आहे. उड्डाणपुलाच्या उभारणीसाठी रस्ता बंद असल्याने एका बाजूने सर्व वाहतूक वळविण्यात आली आहे. आता या रस्त्यावर देखील खोदाई करण्यात येत असून निम्मा रस्ता शिल्लक राहिला आहे. या निम्म्या रस्त्यावरून दोन्ही बाजूने वाहतूक सुरू असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. येथील फुटपाथवर जनरेटर व इतर साहित्य ठेवण्यात आल्याने पादचार्यांना जाण्यासाठी रस्ता नाही. सध्या रस्त्यावर अडचणी निर्माण झाले असून बंद असलेला रस्ता सुरू करावा अशी मागणी होत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









